|

MSRTC Bharti 2026 : एसटी महामंडळात 13,980 जागांसाठी मेगा भरती;लवकरच जाहिरात..

MSRTC Bharti 2026 for 13980

MSRTC Bharti 2026 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे (ST Mahamandal Bharti 2026) एस टी महामंडळात लवकरच 13,980 चालक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ही निवड बाह्य संस्थेमार्फत केला जाणार असून म्हणजे कॉन्ट्रॅक्टवर ही भरती केली जाणार आहे.

या प्रक्रियेत कायमस्वरूपी नोकरीचा आमिष दाखवून तरुणाची फसवणूक होत असल्याच्या काही घटना लक्षात आलेले आहेत तर अशा कोणत्याही घटनेला बळी पडू नये याची दक्षता घेण्याची तसेच गैरव्यवहार करणाऱ्या व कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.

17,500 जागा रिक्त

एसटी महामंडळात चालक वाहक व यांत्रिक गॅस एकूण 17500 पदा रिक्त आहेत ही पद भरण्यासाठी पाठवलेला प्रस्ताव शासनाने नामंजूर केला तसेच नव्या प्रस्तावावरही अद्याप निर्णय झाला नाही मनुष्यबळाची कमतरता असल्याने शासकीय भरती न करता बाहेर संस्थेमार्फत कंत्राटी भरती करण्याचा निर्णय 13 नोव्हेंबरच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.

आणखी 3520 पदे राहणार रिक्त

महामंडळाने राज्य सरकारकडे 17 हजार 500 पदांचा भरतीचा प्रस्ताव ठेवला होता ज्याला आणखी मंजुरी मिळाली नाही. आता 13,980 पदावर कंत्राटी भरती केली तरी तब्बल 3,520 पदे रिक्तच राहणार आहेत.

त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यावरील कामाचा अतिरिक्त ताण कायम राहणार असल्याचे स्पष्ट दिसते तसेच एसटीचे स्टेरिंग कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हाती जाणार असल्याने प्रवासी सुरक्षा मानकाचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

भरती प्रक्रिया मानकानुसारच होईल असा दावा मंत्र्यांनी केला असला तरी काही प्रमाणात याकडे दुर्लक्ष होऊ शकते.

RBL Bank Loan : आरबीएल बँकेमधून या 6 कर्जाच्या व्याजदरावर मिळतेय चांगली सूट;100% कर्जासाठी उत्तम पर्याय

दरम्यान, एसटी महामंडळाच्या नावाचा गैरवापर करून काही खासगी संस्था गरजू व बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवत त्यांच्याकडून अवैधरित्या पैसे उकळत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत.

अशा प्रकारांमुळे नोकरीच्या आशेने असलेल्या तरुणांची आर्थिक फसवणूक होत असून, त्याचा थेट परिणाम एसटी महामंडळाच्या प्रतिमेवर होत आहे.

काही समाजकंटकांच्या गैरकृत्यांमुळे महामंडळाची जनमानसातील प्रतिमा मलीन होणे ही गंभीर बाब असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर, एसटी महामंडळाव्या नावाखाली सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर प्रकारांची सुरक्षा व दक्षता विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.

उमेदवारांची फसवणूक करणाऱ्या संस्था व संबंधित व्यक्तींची ओळख पटवून दोषींविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करावेत, असे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.

भरती प्रक्रियेच्या नावाखाली बेरोजगार तरुणांची आर्थिक लूट करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. भरती प्रक्रियेत पारदर्शकता, विश्वासार्हता आणि उमेदवारांच्या हिताचे रक्षण यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लवकराच जाहिरात येणार !!

13 नोव्हेंबरला 2026 रोजी कंत्राटी भरतीची घोषणा झाली असून लवकरच याची जाहिरात येणार आहे. जे इच्छुक उमेदवार असतील त्या उमेदवाराने खाली दिलेली शैक्षणिक पात्रता व आवश्यक कागदपत्र तपासून अर्ज सादर करायचे आहेत.

पर्मनंट भरतीच्या वेळेस आत्ताचे कंत्राटी भरती मधील जे कर्मचारी असतील त्यांना पुढे प्राधान्य दिले जाऊ शकते त्यामुळे उमेदवाराने जास्त विचार न करता या भरतीसाठी सुद्धा इच्छुक असाल तर अर्ज करावा.

जाहिरात निघाल्यानंतर जाहिराती विषयीची माहिती तुम्हाला लवकरच देण्यात येईल त्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका.

शैक्षणिक पात्रता (MSRTC Recruitment 2026)

चालक तथा वाहक :

  • मान्यताप्राप्त संस्थेमधून किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • अवजड प्रवासी वाहन HMV किंवा HPMV चालवण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव व पीएसव्ही बिल्ला असणे आवश्यक आहे
  • वयोमर्यादा 24 ते 38 वर्ष असेल (वयोमर्यादेमधे शिथिलता दिली जाऊ शकते) त्यासाठी मूळ जाहिरात आल्यानंतर आपल्याला कळेल.

सहायक यांत्रिकी/तांत्रिक ट्रेड :

  • शैक्षणिक पात्रता : दहावी व संबंधित विषयांमधून आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (उदा. डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक, वेल्डर, पेंटर इत्यादी
  • वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष (वयोमर्यादेमधे शिथिलता दिली जाऊ शकते) त्यासाठी मूळ जाहिरात आल्यानंतर आपल्याला कळेल.

आवश्यक कागदपत्रे

  • दहावी/बारावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • ओळखीचा पुरावा
  • जन्म तारखेचा पुरावा
  • पीएसव्ही बिल्ला
  • अवजड वाहन चालवण्याचा परवाना इत्यादी

अर्ज करण्याची पद्धत :

जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची पद्धत व इतर सविस्तर माहिती त्याचबरोबर संवर्गानुसार रिक्त जागाच तपशील जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर देण्यात येईल.

जाहिरातीची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा तसेच टेलिग्रामला सुद्धा जॉईन व्हा.

Paripatrak MSRTC

FAQ

1. MSRTC Bharti 2026 अंतर्गत एकूण किती पदांची भरती होणार आहे?

एस.टी. महामंडळात बाह्य संस्थेमार्फत कंत्राटी पद्धतीने एकूण 13,980 चालक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.

2. ही भरती कायमस्वरूपी आहे की कंत्राटी पद्धतीची आहे?

ही भरती बाह्य संस्थेमार्फत (कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर) म्हणजेच पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे.

3. चालक तथा वाहक पदासाठी शैक्षणिक पात्रता व अनुभव काय आहे?

उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा, तसेच त्याच्याकडे अवजड प्रवासी वाहन (HMV/HPMV) चालवण्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव आणि पीएसव्ही (PSV) बिल्ला असणे आवश्यक आहे.

4. सहायक यांत्रिकी/तांत्रिक पदासाठी पात्रता आणि वयोमर्यादा काय आहे?

या पदासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण व संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) केलेला असावा आणि त्याची वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावी.

5. या भरतीसाठी अर्ज कसा व कधी करावा?

लवकरच या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येतील.

♾️ संबंधित माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *